Thursday, August 7, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

४१ वर्षांपूर्वीचा ‘या’ राज्याला जोडणारा पूल कोसळला

ट्रक पुरात गेला वाहून

४० वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर बांधलेला हा पूल कारवार आणि गोव्याला जोडणारा होता. जुना पूल कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर कन्नडच्या आयुक्तांना नव्या पुलाची गुणवत्ता तपासण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, उत्तर कन्नड जिल्ह्यातील ४१ वर्षांपूर्वीचा जुना कारवार पूल कोसळला (41 years old Karwar bridge collapsed) आणि स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलंअचानक पूल कोसळला आणि ट्रक थेट पाण्यात पडला.

स्थानिकांच्या ही घटना निदर्शनास येताना त्यांनी ट्रक चालकाला वाचवलं आहे. गोवा आणि कर्नाटक राज्याला जोडणारा काली नदीवरील पूल मध्यरात्री कोसळला. दुर्घटनेत पुलावरून जाणारा एक ट्रक नदीत कोसळून पुरात वाहून गेला असून ट्रक चालक बचावला आहे. ही घटना बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली असल्याची महिती मिळत आहे. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून कर्नाटकातील हुबळी शहराकडे एक ट्रक या पुलावरून जात होता. गोवा-कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या काली नदीच्या पुलावरून ट्रक जात असताना तुटलेल्या पुलावरून दुथडी वाहणाऱ्या नदी पात्रात कोसळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles