नागपूर(Nagpur)21 जून :- देवरंजन बहुउद्देशीय संस्थेच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त नृत्य नाटिका, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कलावंतांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण समारंभ रविवार, 23 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक सभागृह, कस्तुरबा भवन, बजाज नगर येथे संध्याकाळी 6 वाजता होणा-या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध सिनेस्टार देवेंद्र दोडके, दामिनी क्रिएशनचे संचालक संदीप दर्यापूरकर, अ. भा. मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती)चे उपाध्यक्ष नरेश गडेकर, कार्यकारी सदस्य संजय रहाटे, कोरिओग्राफर लोकेश तांदूळकर, रुक्माई सेवा मंडळाचे सचिव विलास कुबडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
चिन्मय देशकर लिखित आणि दिग्दर्शित ‘रयतेचा राजा’ या नृत्य नाटिकेचा प्रयोग यावेळी सादर केला जाईल. 60 कलाकारांचा सहभाग असलेल्या या नृत्यनाटिकेचे निर्माते प्रवीण देशकर व समाप्ती देशकर असून संकल्पना आकाश काळे यांची आहे. नृत्य दिग्दर्शन चिन्मय देशकर, स्वप्निल खरे आणि मुग्धा देशकर काळे यांनी केले आहे. नरेश गडेकर, अतुल शेबे आणि डॉ. रवींद्र भुसारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ‘रयतेचा राजा’ नाटकाचा हा दुसरा प्रयोग आहे. कार्यक्रम नि:शुल्क असून नागपूरकर रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देव रंजन बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे.