Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

RESULT : दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे

अखेर दहावी बोर्डाचा निकाल समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या SSC बोर्डाच्या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल आला आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यावेळी तुम्ही ऑनलाइन गुणपत्रिका पाहू शकता.

दरम्यान राज्य शिक्षण मंडळाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्याची दहावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदा 2023-24 राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.21 टक्के लागला असून मुलांचा टक्का 94.56 पर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्क्यांनी अधिक लागला आहे.

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99 टक्के लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला असून तो 94.73 टक्के इतका आहे.

विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44
नागपुर – 94.73
संभाजीनगर – 95.19
मुंबई – 95.83
कोल्हापूर – 97.45
अमरावती – 95.58
नाशिक – 95.28
लातूर – 95.27
कोकण – 99.01

 

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल :

१. https://mahresult.nic.in

२. https://sscresult.mkcl.org

३. https://sscresult.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles