Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

शपथविधी सोहळ्याला नागपुरातील चहावाल्याला निमंत्रण

नागपूर : मुंबईतील आझाद मैदानावर नव्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळा ५ ला होणार असला तरी मुख्यमंत्री आणि इतर खात्यांबाबत अद्यापही अधिकृत घोषणा महायुतीकडून झालेली नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे नागपुरातील फडणवीसांच्या काही खास लोकांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. परंतु यातील बाब म्हणजे फडणवीसांकडून नागपुरातील एका चहावाल्याला विशेष रूपाने आमंत्रित करण्यात आले आहे. महत्त्वाचे या चहावाल्याने स्टॉल सुरू केल्यापासून स्टॉलवर देवेंद्र फडणवीसांचा फोटोही लावण्यास सुरूवात केली. ते आजही आपल्या स्टॉलवर फडणवीसांचा फोटो लावायला विसरत नाही. या चहावाल्याचे नाव गोपाळ बावनकुळे आहे.
सत्ता स्थापनपूर्वी बुधवारी ( दी.४ ) रोजी केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्ष नेता निवडला जाईल. या बैठकीत फडणवीस यांची निवड होणे अपेक्षित आहे. या भैटकीनंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडेल. त्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला जाईल. राज्यपालांकडून मंत्रिमंडळ शपथविधी समारंभ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला असल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह २२ राज्यातील मुख्यमंत्री, देशभरातली अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. अशात नागपुरातील चहाविक्रेत्याला आमंत्रण देण्यात आल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
फडणवीस आमच्या मदतीला धावून येतातनागपुरातील चहाविक्रेते गोपाळ बावनकुळे म्हणाले, ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीसाठी मला पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी आमंत्रण आणि पास पाठवला आहे. मी आवर्जुन शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईला जाणार आहे. चहावाला म्हणून मला आमंत्रण देण्यात आले. फडणवीस आमच्या मदतीला धावून येतात. आम्ही त्यांना मेसेज करतो किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांची भेट घेतो तेव्हा ते आम्हाला मदत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles