Thursday, June 19, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार | lokvahini News | लोकवाहिनी |

महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. तर लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास बळावलेल्या महाविकास आघाडीचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. यानंतर महायुतीत मुख्यमंत्रि‍पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत असून महायुती सरकारचा शपथविधी नेमका कधी आणि कुठे होणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे बोलले जात आहे. मात्र यामुळे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्रि‍पदाबाबत जो निर्णय घेतील, त्यास माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. यामुळे भाजपच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला

—————-

विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड

कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात

पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर कमी दराने कापूस विक्री करण्याची वेळ आली आहे. खाजगी बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून, अनेक ठिकाणी खासगी खरेदीत शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची कापूस कोंडी होताना दिसत आहे. शासनाने कापसाची एमएसपी यावर्षी 7521 रुपये प्रतिक्विंटल इतकी जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी कापूस विक्रीसाठी नेत आहेत त्यावेळेस त्यांना साडेसहा ते सात हजार रुपये क्विंटल ने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयचे 24 केंद्र मंजूर झाले असून केवळ 14 केंद्रावरती शेतकर्‍यांचा कापूस खरेदी सुरू आहे. यातही शेतकर्‍यांच्या कापसामध्ये ओलावा जास्त असल्याचे कारण देऊन 7 हजार 200 ते 7 हजार 400 प्रतिक्विंटल दराने या दराने कापूस खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांना मिळणारा हा दर लागवड खर्चाच्या तुलनेत ही कमी असल्याने किमान नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर शासनाने द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आह

—————-

महायुतीच्या बैठकीआधी एकनाथ शिंदेंनी चक्र फिरवली

अमित शाहांसोबत बैठक घडवली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं. 288 पैकी 236 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपच्या 132 जागा निवडून आल्या आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या 56 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 41 जागा निवडून आल्या आहेत. दरम्यान, महायुतीने निवडणुकीत यश मिळवलं असलं तरी अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय झालेला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद आणि कोणाला किती मंत्रीपदं मिळणार यावर खल सुरु आहे. महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एक बैठक दिल्लीत पार पडली. महायुतीची बैठक होण्याच्या आधी, शाह यांनी शिंदे यांना भेटायला बोलावले होते. अमित शाह आणि एकनाथ शिंदे हे दोघेच फक्त या बैठकीला उपस्थित होते.


 

शिवशाही बसच्या भीषण अपघातात 8 जण ठार

बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्परतेने मदतीला धावले

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात नागपुरकडून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली आहे. या अपघातात 7-8 प्रवासी मृत्यू झाल्याची माहिती असून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 5-7 मृतदेह आत असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु आहे. तर या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.तर दुसरीकडे या अपघाताची बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची यांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी घेतली असून जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.

————–

PM मोदी जाऊ शकतात तर भारतीय संघ का नाही?

चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन तेजस्वी यादवांचा सवाल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड यांच्यातील वादामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघालापाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुनच आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. शेजारी देशांत जाऊन क्रिकेट खेळण्यावर आक्षेप का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव हे देखील व्यावसायिक क्रिकेटपटू होते.पाकिस्तानात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ हा पाकिस्तानला जाणार नाही असे बीसीसीआयने आयसीसीला स्पष्ट केलं आहे. तेजस्वी यादव यांनी मात्र ही भूमिका योग्य नसल्याचे स्पष्टपणे म्हटलं आहे. खेळ आणि राजकारण यांची सांगड घालणे योग्य नसल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

—————-

मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं

पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?

राज्यात सध्या महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. यावेळी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर मुख्यमंत्रीपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे हेदेखील मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपने नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीमधून माघार घेतली होती. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदानंतर खालच्या पायरीवर असणारे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. आपल्याऐवजी शिवसेनेतील अन्य एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्री पद द्यावे आणि मी सरकारमधून बाहेर राहीन, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मात्र, भाजपला एकनाथ शिंदे यांची ही भूमिका मान्य नसल्याचे समजते. यामागे अनेक राजकीय कारणं असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles