Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

जन्मदात्या बापाकडून मुलीसोबत अश्लील चाळे

पुणे: जन्मदात्या बापानेच आपल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.हा प्रकार हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षापासून ते २६ मे दरम्यान घडला.

याप्रकरणी १३ वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ४० वर्षीय नराधम बापावर विनयभंगासह सह पोक्सो अंतर्गत नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना आरोपीने तिच्या सोबत अश्लील चाळे करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलगी दचकून जागी झाली असता तिने याबाबत जाब विचारल्यावर आरोपी तिच्या खोलीतून बाहेर निघून गेला. वडील असल्यामुळे पीडित मुलीने याबाबत कोठेही वाच्यता केली नाही.

२६ मे रोजी चतुर्थी असल्याने पीडित मुलीचे आजी आजोबा गणपती दर्शनासाठी थेऊर येथे गेले होते. तर पीडित मुलगी तिच्या आजोळी (आईच्या वडिलांकडे) गेली होती. रात्री घरी आली आल्यावर पीडित मुलगी हॉलमध्ये टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलीला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला नकार दिला. त्यावेळी त्याने मुलीला अश्लील स्पर्श केला. या प्रकारानंतर मुलीने नराधम बापाला धक्का देऊन पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles